बालविकास व मुलांची सुरक्षितता हा जिव्हाळ्याचा विषय... त्याचबरोबर महिला आणि बालविकासातही आपण कमी पडतो आहोत... यावेळच्या फोरममध्ये त्यावर चर्चा करण्यात येणार आहे...
बालकल्याण आणि महिला विकास हा तसा समाजकल्याणाच्या क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांसाठी जिव्हाळ्याचा विषय. महिला आणि मुलेही सुरक्षित नाहीत, त्यांच्यावरील अत्याचार हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सरकार यासाठी काही करत नाही असेही नाही. पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडताहेत असे वाटते. समाजात वावरत असताना सोसाव्या लागणाऱ्या अत्याचाराचे प्रकार इथली सामाजिक स्थिती दर्शवणारे आहेत. अत्याचारांचा प्रश्न आहेच. त्याचबरोबर महिला आणि मुलांच्या विकासाचाही प्रश्न आहे. गरिबीमुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मुलांना शाळेत पाठवायचे म्हटले तर आर्थिक परिस्थितीचा प्रश्न येतो. काही पालक तर मुलांना शाळेत पाठवताना पोटभर खायला देऊ शकत नाहीत. त्यामुळे कुपोषण होते. अनेक मुले तसेच दिवस काढीत असतात. योग्य आहार मिळत नाही म्हणून मुलाची प्रगती खुंटता कामा नये. राज्यात बालकायदा आहे. त्यानुसार काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे. महिलांच्या विकासासाठी काही योजना राबवायच्या आहेत. सरकारने यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही केली आहे. पण ६६ टक्के निधीचा वापरच केला गेला नाही. यासंदर्भात महालेखापालाच्या अहवालात या खात्यावर ताशेरेही ओढण्यात आले आहेत. काहीजणांना काम करायची इच्छा असते, पण निधी नाही म्हणून त्यांचे हात बांधले जातात. पण इथे निधी मिळतो आहे तरी तो वापरला जात नाही. ही मोठीच शोकांतिका आहे.
अर्थसंकल्पात तरतूद आहे, याचा अर्थ सरकारने काही तरी विचार केला आहे. मग निधी वापरला नाही याला जबाबदार कोण? पुरेसा निधी असूनही महिला आणि बालकल्याणाच्या गोष्टी जर राज्यात पूर्ण होत नसतील तर काय करायचे? सरकारची इथे काही जबाबदारी येते की नाही? असे अनेक प्रश्न त्यामुळे निर्माण होतात. येत्या फोरममध्ये याच विषयावर चर्चा केली जाणार आहे.
Monday, August 25, 2008
Monday, July 21, 2008
दप्तराचे ओझे कसे कमी करता येईल
लहान मुलांच्या बाबतीत दप्तराचे ओझे हा एक चिंतेचा विषय आहे. यावरही अनेकजणांनी विचार मांडले आहेत. पण, प्रत्यक्षात मात्र काही झालेले नाही. हे ओझे वाढतच चालले आहे. काहीठिकाणी काहीजण जुजबी उपाय योजतात. आपल्यापरीने मार्ग काढतात, पण त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकलेला नाही. हे ओझे कमी होण्यासाठी नेमके काय करता येईल यावर विचार होणे आवश्यक आहे. "गोमन्तक'ने हा विचार करण्यासाठी पुढाकार घ्यायचे ठरवले आहे. म्हणूनच यावेळी "गोमन्तक टुडे'च्या "ओपन फोरम'मध्ये "दप्तराचे ओझे कसे कमी करता येईल' या विषयावर चर्चा केली जाणार आहे. २५ जुलै रोजी या फोरमचे "गोमन्तक'मध्ये आयोजन करण्यात येणार आहे.
Labels:
education,
goa,
goa education,
gomantak,
gomantak open forum,
open fourum
Monday, April 21, 2008
पर्यटनाच्या बुरख्याखाली मुलांचे शोषण

विदेशी पर्यटकांकडून लहान मुलांचे होणारे लैंगिक शोषण ही एक चिंतेची बाब बनली आहे। यावेळच्या "गोमन्तक टुडे ओपन फोरम'मध्ये या ज्वलंत विषयावर चर्चा करण्यात येणार आहे। यावर तुमच्याही प्रतिक्रिया/ मते नोंदवा
साडेतेरा लाख लोकसंख्येच्या गोव्यात या लोकसंख्येच्या दुपटीएवढे पर्यटक दरवर्षी येऊन जातात। यातील किमान एक चतुर्थांश पर्यटक परदेशी असतात. देशी पर्यटकांपेक्षा परदेशी पर्यटक अधिक काळ येथे वास्तव्य करतात, अधिक खर्च करतात. मात्र यातूनच, खास करून किनारपट्टी भागांत पर्यटकांचे गैरप्रकार सुरू होतात. लहान मुलांचे लैंगिक शोषण हा यातील सर्वांत महत्त्वाचा विषय आहे. ही बाब लक्षात घेऊन यावेळच्या "गोमन्तक टुडे ओपन फोरम'मध्ये या ज्वलंत विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. शुक्रवार 25 एप्रिल रोजी गोमन्तक भवनमध्ये हा फोरम भरेल. ओपन फोरमच्या माध्यमातून या विषयाकडे नव्याने लक्ष वेधण्याचा हा एक प्रयत्न आहे.
Labels:
goa,
gomantak open forum,
गोमांतक,
चाइल्ड,
चाइल्ड अबुसे
Tuesday, March 25, 2008
राज्यातील वाहतूक अपघात कसे टाळता येतील?

राज्यातील अपघातांचे वाढते प्रमाण हे आज सर्वांच्याच चिंतेचे कारण बनले आहे. लोक त्यावर आपापल्या परीने मार्ग सुचवत आहेत. काहीजण आपल्या परीने मार्ग काढत आहेत. पण ही समस्या सुटण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. काही स्वयंसेवी संस्था यावर मार्ग काढण्यासाठी धडपडत आहेत. पण त्यांची धडपड सरकारच्या पाठबळाअभावी व्यर्थ जात आहे. तरीही लोकांत जागृती करण्याचे काम या संस्था करीत आहेत. अपघात टाळण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. मात्र त्या पातळीवर सगळे आलबेलच आहे. कुठेतरी अपघाताचे मोठे प्रकरण घडले की सरकारला जाग येते. वाहतूक समस्येवर तोडगा निघूच शकणार नाही किंवा निघू शकत असेल तर तो काय असेल? अशा अनेक अंगांनी ओपन फोरममध्ये चर्चा करता येईल. याबाबत आपली मते नोंदवा...
Labels:
gomantak open forum,
open forum,
गोमांतक,
गोया
Monday, February 18, 2008
प्लॅस्टिकचा अतिवापर आणि प्लॅस्टिक कचरा
ओपन फोरम : समर्थ पर्याय शोधण्यासाठी चर्चा, येत्या रविवारी चर्चेसाठी सर्वांना खुले निमंत्रण
भ्रष्टाचार आणि ढासळती नीतिमूल्ये याबद्दल आपण बऱ्याचदा चिंता व्यक्त करत असतो, तरी भ्रष्टाचार वा तत्सम गैरप्रकार रोखू शकत नाही। मात्र भ्रष्टाचारापेक्षाही प्रत्येकाच्या जीवनात प्लॅस्टिकचा वापर अधिक घुसला आहे याकडे आपण लक्ष देत नाही। घरातील आरोग्यापासून बाहेरील पर्यावरणापर्यंत सर्वांनाच ग्रासणारा प्लॅस्टिकच्या अतिवापराचा आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे।
प्लॅस्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावता येत नाही, तो नष्टही करता येत नाही। कायद्याने विशिष्ट प्लॅस्टिकवर घातलेली बंदी कागदोपत्रीच उरते. अचानक कोणा सरकारी यंत्रणेला जाग येते, काही दिवस तथाकथित कारवाईचा बडगा उगारला जातो, पुन्हा येरे माझ्या मागल्या... प्लॅस्टिकचा वापर अव्याहत सुरू राहतो
समाजाचे हित आणि बांधीलकी जपण्याला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या गोमन्तक समूहाने प्लॅस्टिकच्या अतिवापराबाबत आणि प्लॅस्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत जागृती करण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे
दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी भरणाऱ्या गोमन्तक टुडे ओपन फोरममध्ये यावेळी हाच विषय घेऊन सर्व अंगांनी चर्चा करावी असे ठरले आहे. सहज उपलब्ध होते म्हणून उठसूट प्लॅस्टिक वापरावे की प्लॅस्टिकला पर्याय शोधावे,
प्लॅस्टिकचा कचरा कमीतकमी कसा करावा, या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा पुनर्वापर कसा करता येईल अशा विविध मुद्द्यांचा परामर्श या चर्चेत घेता येईल.
भ्रष्टाचार आणि ढासळती नीतिमूल्ये याबद्दल आपण बऱ्याचदा चिंता व्यक्त करत असतो, तरी भ्रष्टाचार वा तत्सम गैरप्रकार रोखू शकत नाही। मात्र भ्रष्टाचारापेक्षाही प्रत्येकाच्या जीवनात प्लॅस्टिकचा वापर अधिक घुसला आहे याकडे आपण लक्ष देत नाही। घरातील आरोग्यापासून बाहेरील पर्यावरणापर्यंत सर्वांनाच ग्रासणारा प्लॅस्टिकच्या अतिवापराचा आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे।
प्लॅस्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावता येत नाही, तो नष्टही करता येत नाही। कायद्याने विशिष्ट प्लॅस्टिकवर घातलेली बंदी कागदोपत्रीच उरते. अचानक कोणा सरकारी यंत्रणेला जाग येते, काही दिवस तथाकथित कारवाईचा बडगा उगारला जातो, पुन्हा येरे माझ्या मागल्या... प्लॅस्टिकचा वापर अव्याहत सुरू राहतो
समाजाचे हित आणि बांधीलकी जपण्याला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या गोमन्तक समूहाने प्लॅस्टिकच्या अतिवापराबाबत आणि प्लॅस्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत जागृती करण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे
दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी भरणाऱ्या गोमन्तक टुडे ओपन फोरममध्ये यावेळी हाच विषय घेऊन सर्व अंगांनी चर्चा करावी असे ठरले आहे. सहज उपलब्ध होते म्हणून उठसूट प्लॅस्टिक वापरावे की प्लॅस्टिकला पर्याय शोधावे,
प्लॅस्टिकचा कचरा कमीतकमी कसा करावा, या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा पुनर्वापर कसा करता येईल अशा विविध मुद्द्यांचा परामर्श या चर्चेत घेता येईल.
Labels:
gomantak,
gomantak open forum,
ओपन forum,
गोया
Monday, January 21, 2008
गोमन्तक टुडे "ओपन फोरम' नव्या स्वरुपात
मागील एक वर्षापासून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडवून आणण्यासाठी नियमित व्यासपीठ ठरलेला "गोमन्तक टुडे'चा ओपन फोरम आता नव्या वर्षात आपले स्वरूप बदलतो आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आता फोरमचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या फोरमसाठी वाचकांना आपली मते आधीही नोंदवता येणार आहेत. पत्राद्वारे, तसेच एसएमएस, ई-मेलद्वारेही आपल्याला संबंधित विषयावरील आपली मते व प्रश्न मांडता येतील. यासाठी आठवडाभर आधी विषय जाहीर करण्यात येणार आहे.15 डिसेंबर 2006 पासून "गोमन्तक टुडे' "ओपन फोरम'चा अभिनव उपक्रम सुरू केला. दर शुक्रवारी होणारा हा ओपन फोरम 55 आठवडे अखंडितपणे सुरू होता. यामध्ये सामाजिक, राजकीय, विज्ञान, आरोग्य, महिला, आर्थिक, शिक्षण अशा विविध विषयांवर चर्चा घडवून आणण्यात आली. यासाठी त्यात्या विषयातील जाणकार पॅनेलिस्टना आमंत्रित करण्यात आले. वाचकांनीही त्यामध्ये सक्रिय सहभाग दर्शवला आणि आपली मतेही मांडली. "गोमन्तक टुडे'मध्ये फोरममध्ये झालेल्या चर्चेचा वृत्तांत आकर्षक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला व इन गोवा मराठी आणि प्रुडन्ट मीडिया या वृत्त वाहिन्यांनीही या उपक्रमाचे वृत्तसंकलन आपल्या चॅनेलवरुन प्रसारित केले.आता नव्या स्वरूपात एक आठवडा आधी फोरमचा विषय जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या वाचकांना फोरमला उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांना पत्र, ई-मेल, एसएमएसद्वारेही आपली मते तसेच प्रश्न विचारणे शक्य होणार आहे. अधिकाधिक वाचकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी आणि त्याची व्याप्ती अधिक वाढवण्याचा यामागे "गोमन्तक टुडे'चा उद्देश आहे.
Labels:
goa,
goa education,
gomantak,
gomantak open forum,
open forum
शिक्षण संकुल : दर्जेदार शिक्षणासाठी, सकस समाजनिर्मितीसाठी

शिक्षण हा विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचा. भावी पिढीची जडणघडण जिथे सुरू होते ते ज्ञानमंदिर म्हणजे शाळा. प्राथमिक असो वा माध्यमिक, शाळा "चांगली' पाहिजे असा आपला आग्रह असतो. शाळेची इमारत यासारख्या मुद्द्यापासून शाळेतील शिक्षक, वातावरण, उपक्रम अशा अनेक बाबींचा त्यात समावेश होतो. अगदी शाळेला मैदान आहे की नाही इथपर्यंत.राजधानीच्या पणजी शहराचे उदाहरण घेतले तर या आघाडीवर फारच निराशाजनक चित्र दिसते. पणजी शहरात आणि आसपासच्या भागांत प्राथमिक आणि माध्यमिक मिळून जेवढ्या शाळा आहेत, त्यातील किती शाळांच्या अद्ययावत इमारती आहेत, किती शाळांना मैदाने आहेत, किती शाळांतील मुलांसाठी येण्याजाण्याची चांगली सुविधा आहे या प्रश्नांवर विचार सुरू केला तर भयावह चित्र नजरेसमोर उभे राहते. अपुऱ्या जागेत, कशाबशा खोल्यांमध्ये मुलांचे शिक्षण सुरू असते. पालक कसेबसे त्यांना आणून सोडतात, शाळा सुटल्यावर घरी घेऊन जातात. स्कूलबस अथवा टॅक्सी-रिक्षा असली तरी या व्यवस्थेतही अडचणी असतात. मुलांच्या मानसिक आणि शैक्षणिक जडणघडणीशी हे विषय थेट संबंधित आहेत.या विषयांवर मोकळ्या वातावरणात चर्चा झाली तर काहीतरी ठोस निष्पन्न होऊ शकेल. आपल्या मुलांचे आयुष्य चांगले घडण्यात हातभार लागू शकेल. अशा विचारानेच आम्ही हा विषय "गोमन्तक टुडे, ओपन फोरम'मध्ये चर्चेसाठी घेण्याचे ठरविले आहे. "गोमन्तक टुडे'चा साप्ताहिक ओपन फोरम गेले वर्षभर अथकपणे सुरू राहिला. यापुढेही ते वाचकांसाठी खुले आहेच, फक्त वेगळ्या स्वरूपात आणि नव्या दिमाखात. नव्या वर्षात दर महिन्यातून एकदा हा फोरम भरेल. नव्या स्वरुपातील पहिल्या फोरमचा विषय मुलांच्या जडणघडणीशी संबंधित असला तर उत्तम. याद्वारे एका चांगल्या समाजाच्या उभारणीस हातभार लावता येईल आणि "गोमन्तक'चे समाजाशी असलेले जुने नाते अधिक दृढ करता येईल अशा विचारातून हा विषय आम्ही येत्या रविवारच्या फोरमसाठी घेत आहोत.हो, यावेळचा ओपन फोरम रविवारी सकाळी असेल. पणजी आणि आसपासच्या भागांतील गर्दीत सापडलेल्या शाळा शहराबाहेर विस्तृत ठिकाणी हलवायच्या असा प्रस्ताव घेऊन आम्ही हा फोरम भरवत आहोत. बांबोळी अथवा रायबंदर किंवा दोनापॉल यासारख्या जवळपासच्या एखाद्या ठिकाणी या सर्व शाळा हलवाव्यात. तिथे मोकळी हवा असेल, मोठी मैदाने असतील, वाहतुकीचा गोंगाट नसेल. प्रत्येक भागातून ठराविक वेळेला मुलांची ने-आण करण्यासाठी स्कूल बसेस असतील. आपण थोडा विचार केला तर लक्षात येईल की मुलांच्या आणि पालकांच्याही दृष्टीने ही व्यवस्था खूप चांगली तसेच सोयीची बनू शकते.मध्यंतरी मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांनी अशा प्रकारच्या प्रस्तावाचे सूतोवाच केले होते. विद्यार्थी आणि पालकांची सोय होण्याबरोबरच पणजीतील वाहतुकीची कोंडीही कमी होऊ शकते असा हा प्रस्ताव आहे. गरज आहे व्यापक स्तरावर विचार करण्याची. यापुढे पणजीतील गर्दी-गोंगाट वाढतच जाणार आहे. मुळातच मोकळ्या जागा फारशा उरलेल्या नाहीत, त्यावरही आक्रमण होत जाणार आहे. दर दिवशी मुलांना शाळेपर्यंत ने अन सोडायचे आणि परत आणायचे यापेक्षा पालक घराच्या जवळून जाणाऱ्या स्कूलबसमधून मुलांना पाठवू शकतील. मुलांना मोकळा श्वास घेत आणि काही वेळ मैदानावर खेळत शिक्षणाचा आनंद लुटता येईल.अशा अनेक बाबी या विषयाअंतर्गत येतात. प्रश्न आपण नव्या परिस्थितीशी अनुरूप असा मार्ग स्वीकारण्याचा आहे. त्यामुळे या विषयाची सुरवात चर्चेने करूया, गोमन्तक टुडे ओपन फोरममध्ये सहभागी होऊन. हा फोरम सर्वांसाठी खुला असतो, हे वेगळे सांगायची गरज नाहीच.
Subscribe to:
Posts (Atom)
