मागील एक वर्षापासून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडवून आणण्यासाठी नियमित व्यासपीठ ठरलेला "गोमन्तक टुडे'चा ओपन फोरम आता नव्या वर्षात आपले स्वरूप बदलतो आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आता फोरमचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या फोरमसाठी वाचकांना आपली मते आधीही नोंदवता येणार आहेत. पत्राद्वारे, तसेच एसएमएस, ई-मेलद्वारेही आपल्याला संबंधित विषयावरील आपली मते व प्रश्न मांडता येतील. यासाठी आठवडाभर आधी विषय जाहीर करण्यात येणार आहे.15 डिसेंबर 2006 पासून "गोमन्तक टुडे' "ओपन फोरम'चा अभिनव उपक्रम सुरू केला. दर शुक्रवारी होणारा हा ओपन फोरम 55 आठवडे अखंडितपणे सुरू होता. यामध्ये सामाजिक, राजकीय, विज्ञान, आरोग्य, महिला, आर्थिक, शिक्षण अशा विविध विषयांवर चर्चा घडवून आणण्यात आली. यासाठी त्यात्या विषयातील जाणकार पॅनेलिस्टना आमंत्रित करण्यात आले. वाचकांनीही त्यामध्ये सक्रिय सहभाग दर्शवला आणि आपली मतेही मांडली. "गोमन्तक टुडे'मध्ये फोरममध्ये झालेल्या चर्चेचा वृत्तांत आकर्षक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला व इन गोवा मराठी आणि प्रुडन्ट मीडिया या वृत्त वाहिन्यांनीही या उपक्रमाचे वृत्तसंकलन आपल्या चॅनेलवरुन प्रसारित केले.आता नव्या स्वरूपात एक आठवडा आधी फोरमचा विषय जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या वाचकांना फोरमला उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांना पत्र, ई-मेल, एसएमएसद्वारेही आपली मते तसेच प्रश्न विचारणे शक्य होणार आहे. अधिकाधिक वाचकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी आणि त्याची व्याप्ती अधिक वाढवण्याचा यामागे "गोमन्तक टुडे'चा उद्देश आहे.

2 comments:
Its very good forum
I find while reading the brief of open form published next day in Gomantak that same faces are attending and expressing their thoughts though the subject is different.Why? Why young generation keep themselves away from this type of debate? Gomantak should organize forum in various colleges instead of closed hall. See what new generation has to say about the burning questions being faced by them and their parents.
Post a Comment