Monday, February 18, 2008

प्लॅस्टिकचा अतिवापर आणि प्लॅस्टिक कचरा

ओपन फोरम : समर्थ पर्याय शोधण्यासाठी चर्चा, येत्या रविवारी चर्चेसाठी सर्वांना खुले निमंत्रण

भ्रष्टाचार आणि ढासळती नीतिमूल्ये याबद्दल आपण बऱ्याचदा चिंता व्यक्‍त करत असतो, तरी भ्रष्टाचार वा तत्सम गैरप्रकार रोखू शकत नाही। मात्र भ्रष्टाचारापेक्षाही प्रत्येकाच्या जीवनात प्लॅस्टिकचा वापर अधिक घुसला आहे याकडे आपण लक्ष देत नाही। घरातील आरोग्यापासून बाहेरील पर्यावरणापर्यंत सर्वांनाच ग्रासणारा प्लॅस्टिकच्या अतिवापराचा आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्‍न आता ऐरणीवर आला आहे।

प्लॅस्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावता येत नाही, तो नष्टही करता येत नाही। कायद्याने विशिष्ट प्लॅस्टिकवर घातलेली बंदी कागदोपत्रीच उरते. अचानक कोणा सरकारी यंत्रणेला जाग येते, काही दिवस तथाकथित कारवाईचा बडगा उगारला जातो, पुन्हा येरे माझ्या मागल्या... प्लॅस्टिकचा वापर अव्याहत सुरू राहतो
समाजाचे हित आणि बांधीलकी जपण्याला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या गोमन्तक समूहाने प्लॅस्टिकच्या अतिवापराबाबत आणि प्लॅस्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत जागृती करण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे

दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी भरणाऱ्या गोमन्तक टुडे ओपन फोरममध्ये यावेळी हाच विषय घेऊन सर्व अंगांनी चर्चा करावी असे ठरले आहे. सहज उपलब्ध होते म्हणून उठसूट प्लॅस्टिक वापरावे की प्लॅस्टिकला पर्याय शोधावे,
प्लॅस्टिकचा कचरा कमीतकमी कसा करावा, या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा पुनर्वापर कसा करता येईल अशा विविध मुद्द्यांचा परामर्श या चर्चेत घेता येईल.

2 comments:

Durgadas Kamat said...

plastic problem is becoming a worst problems not in cities like panji or mapusa .but also in the cities like ponda. people in ponda are welcomed by a lot of plastic waste near rto office while entering in to the cities. the goverment of goa is just sleeping and not working on it. hon'ble cm is only making promises and nothing. the government of goa is responsible for the increase in the use of plastic. the govt of goa shouls impose a strict law to decrease the use of plastics. the government of goa shouls aslo setup plastic recycle palnts in the state.

Durgadas Kamat said...

the more use of plastics means less life in human beings. its a high time now that the whole of society should come together and should say no to plastics.

the initiative should be taken by our elected represented to ban plastic